बजेट पूर्ण फेल असल्याची विरोधकांची टीका
निवडणुकीच्या तोंडावर मतदार आणि उद्योजकांना खूश करण्याचा प्रयत्न करताना एकीकडे सरकार अपयशी ठरले असताना संपुआ सरकारच्या हंगामी अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. हंगामी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सीपीआय नेता गुरुदास दासगुप्ता यांनी म्हटले आहे, की सरकार मंदीच्या परिणामांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरली असून केवळ आपण केलेले काम सागून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नोकर कपातीच्या संदर्भात काहीही उपाययोजना अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. तर भाजपचे नेते हरेन पाठक म्हणाले, की कॉंग्रेसचा 'हात' आम आदमीचा गळा आवळण्यासाठी आहे. सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहे.