मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (19:53 IST)

लोकसभा निवडणुकीसाठी 850 कोटीची तरतूद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ही तरतूद केली आहे.

सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी 850 कोटी तर इतर निवडणुकांसाठी 227 कोटींची तरतूद केली आहे. मतदारांना ओळखपत्र देण्यासाठी 43 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.