करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ !
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे. पुरूष व महिला दोघांच्या करमुक्त उत्पन्नात दहा हजारांनी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ हजारांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुरूषांचे १ लाख ६० हजारांचे, महिलांचे १ लाख ९० हजाराचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे २ लाख ४० हजाराचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होईल. या आधी पुरूषांचे दीड लाख, महिलांचे १ लाख ८० हजार आणि ज्येष्ठ नागरिकांचे २ लाख २५ हजारापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचवेळी प्राप्तीकरावरील दहा टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे. वर्ग सद्यस्थिती प्रस्तावित तरतूद वाढ करात फायदा पुरुष 1.50 लाख 1.60 लाख 10 हजार 1 हजारमहिला 1.80 लाख 1.90 लाख 10 हजार 1 हजारज्येष्ठ नागरिक 2.25 लाख 2.40 लाख 15 हजार 1.5 हजार