राष्ट्रकुल खेळांसाठी 3,472 कोटी
दिल्लीत 2010 वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी सरकारने अर्थसंकल्पात खास तरतूद केली आहे. बजेटमध्ये सरकारने 3,472 कोटी या स्पर्धेसाठी दिले आहेत. मागील बजेटमध्ये सरकारने या खेळांसाठी 2,112 कोटी देण्याची घोषणा केली होती. चालू अर्थसंकल्पात यात वाढ करण्यात आली आहे. यातील काही निधी या स्पर्धांच्या सुरक्षिततेसाठीही खर्च करण्यात येणार आहे.