1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By

'बजेट' म्हणजे काय, हा शब्द कुठून आला?

Union Budget 2018 News - Live
बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो कसा प्रचलित झाला हे आपल्याला ठाऊक नसते. बजेट या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द 'बुजेत'पासून झाली आहे. याचा अर्थ 'चामड्याची पिशवी' असा होतो. (आपण आपले पैसेही चामड्याच्या पिशवीत म्हणजे पाकिटातच ठेवतो.) आपल्या घरातही आपण बजेट या शब्दाचा सर्रास वापर करत असतो. लग्न कार्य असेल किंवा महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालायचा असेल तर बजेट हा शब्द आपसूक आपल्या तोंडी येतो.
 
बजेट शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडित हा किस्सा आहे. 1733 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले, येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्या सोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले. परंतु, यानंतर काही दिवसांनंतर त्यांची चेष्टा करण्यासाठी 'बजेट इज ओपन' या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि यानंतर हा शब्द प्रचलित झाला.