1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
  4. Career in PHD Computer Engineering Make a career in PHD Computer Engineering, Know Eligibility, Syllabus, Scope

Career in PHD Computer Engineering: पीएचडी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या

Career in PHD Computer Engineering
डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग हा कोर्स  3 ते 5 वर्षाचा डॉक्टरेट स्तरावरील पदवी अभ्यासक्रम आहे. या मध्ये पीएचडी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग कोर्स विद्यार्थ्यांना व्यवसाय अनुप्रयोग, डेटाबेस अॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, ई-कॉमर्स मूलभूत तत्त्वे आणि सॉफ्टवेअर प्रकल्प व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचा अभ्यास आहे. 
 
पात्रता निकष -
*  इच्छुक उमेदवाराकडे कॉम्प्युटर इंजिनीअरिंग संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एम फील असणे आवश्यक आहे. 
*कॉम्प्युटर इंजिनीअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे
* राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 5% गुणांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
* यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 
 प्रवेश प्रक्रिया -
कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात  प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवल्यावरच त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 
अर्ज प्रक्रिया -
 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 
प्रवेश कसे मिळवायचे - 
*  उमेदवारांनी पीएचडी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
 पीएचडी कॉम्प्युटर इंजिनीअरिंग साठी प्रवेश प्रक्रिया UGC NET, CSIR NET, GATE इत्यादी प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना डॉक्टरेट स्तरावर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
 
अभ्यासक्रम-
मल्टीमीडिया सिस्टम 
मोबाइल कंप्यूटिंग 
एडवांस्ड वेब डिजाइन 
एडवांस्ड डेटाबेस
 ई-कॉमर्स टेक्नोलॉजी 
डेटा माइनिंग अँड डेटा वेयरहाउसिंग 
 
ईयर 2 
एसिक डिजाइन 
वेब टेक्नोलॉजी 
डेटा स्ट्रक्चर अँड एलगोरिदम्स 
कंप्यूटर आर्टिटेक्चर 
सॉफ्टवेयर इंजीनियरिंग मेथेडलॉजी 
कंप्यूटर नेटवर्क इंजीनियरिंग अँड मैनेजमेंट
 मेथमेटिकल स्ट्रक्चर ऑफ कंप्यूटर साइंस 
डेटाबेस टेक्नोलॉजी 
ऑपरेटिंग सिस्टम डिजाइन 
एडवांस सिस्टम सॉफ्टवेयर
 
 ईयर 3 
डिजिटल इमेजिंग 
विज्यूलाइजेशन टेक्नीक 
क्रीएटीव थिंकिंग 
न्यूरल नेटवर्क, आर्टिटेक्चर एंड एप्लीकेशन 
प्रफॉरमेंस इवेल्यूएशन ऑफ कंप्यूटर सिस्टम अँड नेटवर्क
 एडवांस्ड नेटवर्क 
सॉफ्ट कंप्यूटिंग 
पैटर्न रिकोगनाइजेशन
 
शीर्ष महाविद्यालये -
जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालय
 एएमयू, अलीगढ़
 एनआईटी, कुरुक्षेत्र
 एसवीएनआईटी, सूरत
 जीएनडीयू, अमृतसर
 एमपीएसटीएमई, मुंबई
 केजेएससीई, मुंबई
 
  जॉब व्याप्ती  -
कंप्यूटर इंजीनियर
 एप्लीकेशन इंजीनियर
 रिसर्च असिस्टेंट
 डिजाइन इंजीनियर
 नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर
 
 
Edited By- Priya Dixit