बारावीनंतर BHM बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, नोकरी, पगार जाणून घ्या

Last Modified बुधवार, 29 जून 2022 (15:52 IST)
in Bachelor of Hotel Management-BHM after 12th : अलीकडेच प्रत्येक राज्यात 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपुढे 12 वी नंतर काय करावे हा मोठा प्रश्न असतो. करिअरची निवड कशी करावी जेणे करून त्यांना भविष्यात त्याचा फायदा होईल. तर हॉटेल मॅनेजमेंटची आवड असेल तर
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट- BHM हा व्यवस्थापन क्षेत्रातील आणखी एक अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 वर्षांचा आहे. 12वी नंतर विद्यार्थी BHM करू शकतात. BHM कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी करू शकतो. व्यवस्थापन आणि विशेषतः हॉटेल मॅनेजमेंटमध्ये रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम कोर्स आहे. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा स्कोपही चांगला आहे आणि करिअरचा पर्यायही खूप चांगला आहे.

BHM: पात्रता -
1. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी भाषेचे ज्ञान.
3. केवळ 19 ते 22 वयोगटातील विद्यार्थीच अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयात 2 ते 3 वर्षे सूट मिळू शकते.
4.जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला असेल आणि आता लेटरल एंट्रीद्वारे पदवीसाठी अर्ज करत असाल, तर विद्यार्थ्यांनी डिप्लोमा 50% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा.

प्रवेश प्रक्रिया -
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे तीन प्रकारचे पर्याय आहेत. यात गुणवत्ता यादी, प्रवेश परीक्षा आणि लॅटरल प्रवेश यांचा समावेश आहे.

1 गुणवत्ता यादी -
अशा काही संस्था आहेत ज्या गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेत प्रवेश देतात. गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावीत चांगले गुण मिळाले पाहिजेत, जेणे करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवता येईल.

2 प्रवेश परीक्षा-

BHM मध्ये दोन प्रकारच्या प्रवेश चाचण्या आहेत, एक राष्ट्रीय स्तरावर आणि एक संस्था/महाविद्यालय स्तरावर. अनेक संस्था त्यांच्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेतात आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यादी जारी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोलावतात.

3 लॅटरल प्रवेश-
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, पदवीसाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी लेटरल एंट्रीसाठी अर्ज करू शकतात आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात. यासाठी त्यांना निवडलेल्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी पात्रतेची माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक संस्था आपापल्या नियमांनुसार अभ्यासक्रमाची पात्रता ठरवते.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गटचर्चेसाठी बोलावतात. या फेरीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नंतर मुलाखतीची फेरी होईल. ही फेरी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोलावतात.

अभ्यासक्रम -
1 वर्ष -
* होटल इंजीनियरिंग
* फाऊंडेशन कोर्सेज इन फूड प्रोडक्शन

* फाऊंडेशन कोर्सेज इन फ्रंट ऑफिस

* फाऊंडेशन कोर्सेज इन फूड एंड बेवरेज सर्विस
* एप्लीकेशन ऑफ कंप्यूटर
* प्रिंसिपल ऑफ फूड साइंस फाउंडेशन कोर्स एकोमेंटेशन ऑपरेशन 1
* कम्युनिकेशन अकाउंटेंसी न्यूट्रीशन
* फाऊंडेशन कोर्सेज इन टूरिज्म

2 वर्ष -
* फूड प्रोडक्शन ऑपरेशन
*
फ्रंट ऑफिस ऑपरेशन
* फूड एंड बेवरेजे ऑपरेशन
* एकोमेंटेशन ऑपरेशन फूड सेफ्टी एंड क्वालिटी
*
रिसर्च मेथाडोलॉजी
* होटल अकाउंटेंसी
* फूड एंड बेवरेजेस कंट्रोल
* ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट
* मैनेजमेंट इन टूरिज्म
इंडस्ट्रियल ट्रेनिंग
कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश

3 वर्ष -
*
फैकेल्टी प्लानिंग
* फूड अँड बेवरेज मैनेजमेंट
* फ्रंट ऑफिस मैनेजमेंट
* एकोमेंटेशन मैनेजमेंट
* ऍडव्हान्स फूड अँड बेवरेज मैनेजमेंट
* स्ट्रैटेजिक मैनेजमेंट
* एडवांस फूड अँड बेवरेज ऑपरेशन
* फाइनेंशियल मैनेजमेंट
* रिसर्च प्रोजेक्ट गेस्ट लेक्चर


BHM साठी उत्कृष्ट महाविद्यालय
आणि फी -
1. वेलकमग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कर्नाटक फी- 14.42 लाख रुपये
2. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बंगलोर फी-
7 लाख रुपये
3. हॉटेल मॅनेजमेंट क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोर विभाग फी- 5 लाख रुपये
4. एम्स संस्था, बंगलोर फी- 4.8 लाख रुपये
5. एमिटी युनिव्हर्सिटी, लखनौ फी- 6 लाख रुपये
6. ओरिएंटल स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, वायनाड फी- 3.13 लाख रुपये
7. केएलई सोसायटी, बंगळुरूचे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट फी- 1 लाख रुपये
8. गार्डन सिटी युनिव्हर्सिटी, बंगलोर फी- 6.15 लाख रुपये
9. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अहमदाबाद फी- 5.82 लाख रुपये
BHM कोर्स डिस्टन्स मोडमध्येही करता येईल

नोकरीची संधी आणि -

बीएचएम केल्यानंतर विद्यार्थी अनेक क्षेत्रात नोकरी करू शकतात. त्याची व्याप्ती खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीसोबत चांगले पैसे मिळू शकतात.

किचन शेफ : किचन शेफचे मुख्य काम हॉटेलमधील जेवणासाठी जेवण तयार करणे आहे. जेवणाच्या मेनूचे नियोजन करणे, स्वयंपाकघर, वेटर आणि बरेच काही व्यवस्थापित करणे ही त्याची भूमिका आहे. वार्षिक उत्पन्न 2.95 लाखांपर्यंत असू शकते.

फ्रंट डेस्क ऑफिसर -फ्रंट डेस्क मॅनेजर कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. वार्षिक उत्पन्न - 3.06 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

अकाउंटिंग मॅनेजर - लेखा व्यवस्थापकाची भूमिका फर्मच्या खात्यांवर आणि व्यवहारांवर लक्ष ठेवणे असते. वार्षिक उत्पन्न - 7.16 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर - हॉटेल सुरळीत चालवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना बनवणे हे कार्यकारी हाऊसकीपरचे काम असते. या क्षेत्रात तुम्ही 4.75 लाख रुपये कमवू शकता.

केटरिंग ऑफिसर : केटरिंग ऑफिसर अन्न आणि सेवांचा दर्जा ठरवतो. फर्ममधील अन्न सेवांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी जबाबदार. या क्षेत्रात तुम्ही रु.5.09 लाखांपर्यंत कमाई करू शकता.

केबिन क्रू -केबिन क्रूचे मुख्य कार्य म्हणजे हवाई प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेची खात्री करणे. यामध्ये तुम्ही 5.09 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंटमधील टॉप रिक्रूटर्स -
*ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स
* ओबेरॉय ग्रुप
* कतार एअरवेज
* डोमिनोज
* आयटीसी

बीएचएम नंतर उच्च शिक्षण -
1. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
2. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
3. एमबीए (इव्हेंट मॅनेजमेंट)
4. एमबीए (एक्झिक्युटिव्ह)
5. एमबीए (हॉटेल मॅनेजमेंट)
यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी  कोणत्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत जाणून घ्या
Exam Preparation Strategy: UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षेचे निकाल आधीच ...

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध
भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन, ज्या दिवशी भारत स्वतंत्र ...

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत ...

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
डेंग्यू संसर्ग ही जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे .

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ...

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ठरू शकतो?
शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य ...