शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

सौंदर्याची खाण तन्वी व्यास

- गायत्री शर्मा

स्वप्न सत्यात येणे म्हणजे काय ते 'मिस इंडिया अर्थ 2008' तन्वी व्यासला विचारा. स्वप्नांना परिश्रमपूर्वक सत्यात आणण्याचा प्रयत्न तन्वीने केला. ग्राफिक डिझायनर असलेली तन्वी 'मिस इंडिया अर्थ 2008' मिळवून आता पुढच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. तन्वीच्या यशाचे रहस्य जाणून घेऊया तिच्याच शब्दात.....

प्रश्न: छोट्या शहरापासून ते 'मिस इंडिया अर्थ'चा हा कसा होता?
उत्तर- 'फेमिना मिस इंडिया' पर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप यादगार ठरला. मला अनेक मोठ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवातून मला जबाबदारीची जाणीव झाली आहे. मिस अर्थचा किताब मिळाल्याने समाजात माझी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाप्रती‍ असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मला खरे उतरायचे आहे.

प्रश्न: 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
उत्तर- खरे सांगायचे झाले तर स्पर्धेत भाग घेण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. परंतु, माझी आई आणि माझ्या काकूची इच्छा होती की, मी 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये भाग घ्यावा. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच मी अहमदाबादमध्ये या स्पर्धेची ऑडिशन टेस्ट दिली.

प्रश्न: तुला मिळालेल्या यशामागे कुठल्या गोष्टी आहेत, काही सांगू शकशील?
उत्तर- मी स्वत:ला खूप भाग्यशाली आहे, त्यामुळेच तर एकढा मोठा सन्मान मिळाला. माझे परिश्रम आणि परमेश्वराची कृपादृष्टी यामुळेच मला पुढे जाण्याची संधी मिळाली. मी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला नसता तर मला एवढे मोठे शिखर गाठायला मिळाले नसते.

प्रश्न: मिस इंडिया बनल्यानंतर तुला काय अनुभव आला?
उत्तर- मिस इंडियाचा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर जगभ्रमण करण्याची संधी मिळाली. या पुरस्काराने माझी एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे आणि तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.

प्रश्न: मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर तुला कुठल्या ऑफर मिळाल्या?
उत्तर- मिस इंडिया झाल्यानंतर मला खूप सार्‍या ऑफर मिळाल्या. सध्या मी टाटा इंडिकामच्या 'गर्वी गुजरात' नामक एक व्हिडियो कंपनीत काम करत आहे. यात गुजरात राज्यातील 'शन्यातून विश्व निर्माण करणार्‍या नागरिकांचे अनुभव कथन करण्यात आले आहे. तरी मला चांगल्या ऑफर्सची प्रतिक्षा आहे.

प्रश्न: मिस इंडियाच्या स्पर्धेत आपल्या राष्ट्रभाषेत बोलणे अनिवार्य केले पाहिजे का?
उत्तर- आपण भारतीय आहोत आणि आपल्या राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हिंदी ही एक सुंदर व गोड भाषा आहे. हिंदी भाषा अशा राष्ट्रीय स्पर्धांत अनिवार्य केली पाहिजे. मी या आधी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती. मला तेथे अशा काही मुली भेटल्या की, त्यांना इंग्रजी भाषा बोलता येत नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या राष्ट्रभाषेत स्वत:ला अभिव्यक्त केले.

प्रश्न: 'ग्राफिक डिझायनर' झाल्यानंतर आता कुठल्या क्षेत्रात करियर घडवू इच्छिते?
उत्तर- मला बिझनेस वुमन व्हायचे आहे. एक लाइफ स्टाइल डिजाइनर स्टोअर्स सुरू करण्याची माझी इच्छा आहे. तेथे मी प्रत्येक प्रकारच्या डिझायनिंग संबंधी नागरिकांना निर्माण होणारे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान करणार आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. मला या क्षेत्रात जे काही अनुभव आले आहेत ते मी नागरिकांमध्ये वाटू इच्छिते तसेच माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावू इच्छिते. आज आपल्या देशात ग्रुमिंगची खूप आवश्यकता आहे. काही नागरिक असे आहेत की, त्यांना आयुष्यात काय व्हायचे आहे. त्यांच्यासाठी भविष्यात ग्रूमिंग शाळा सुरू करण्याचा मानस आहे.