मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)

राज्यात कोरोनाचे ६,७३८ नवे रुग्ण दाखल

राज्यात बुधवारी कोरोनाचे ६,७३८ नवे रुग्ण आढळले आहे. तर ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात आतापर्यंत एकूण १४,८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.५३% एवढे झाले आहे. 
 
राज्यात बुधवारी ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 
देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे.