शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (11:19 IST)

300 एक्स-रे समतुल्य एक सीटीस्कॅन, अरोग्यासाठी नुकसानदायक

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान मांडला आहे. लाख प्रयत्न करुन देखील संक्रमण आटोक्यात येत नाहीये. या दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की सध्या अनेक लोक आवश्यकता नसून देखील सीटी स्कॅन करवत आहे. यामुळे नुकसान होण्याची शक्यता नकारता येत नाही कारण याने आपण स्वत:ला रेडिएशनच्या संपर्कात आणत आहात. याने नंतर कर्करोग होण्याची शक्तया उद्भवते.
 
त्यांनी म्हटले की सीटी-एससीएन आणि बायोमार्करचा गैरवापर होत आहे. हल्के लक्षण असल्यावर सीटी स्कॅनचा काही फायदा नाही. एक सीटी-स्कॅन 300 छातीच्या एक्स-रे समान आहे, हे अत्यंत धोकादायक ठरु शकतं.
 
गुलेरिया यांनी म्हटलं की ‘घरी उपचार घेत असलेल्यांनी स्टेरॉइड घेऊ नये. माइल्ड लक्षणं असल्यास स्टेरॉइड दिलं जातं. मॉडरेट आजारात तीन प्रकारे उपचार होतं. सर्वात आधी ऑक्सिजन द्यावी, ऑक्सिजन देखील औषध आहे. नंतर स्टेरॉइड देऊ शकता. होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍यांनी सतत डॉक्टरांशी संपर्क राखावा. सेचुरेशन 93 किंवा याहून कमी होत असल्यास, बेशुद्ध होणे किंवा छातीत वेदना जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.