मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 30 मे 2020 (13:06 IST)

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

मोदी आणि अमित शहा यांच्यात झाली चर्चा  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील रणनीती ठरवण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काही इतर वरिष्ठ  अधिकार्यांसोबत बैठक घेतली. लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून काही निर्बंध शिथिल करत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
केंद्रीय गृहमंत्रालयाला वेगवेगळ्या राज्या आणि क्षेत्रांकडून माहिती घेऊन विश्लेषण करण्यास सांगितले आहे. काही राज्यांनी तर आधीच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्नाटकसारख्या राज्यांनी धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर सर्वसहमतीने निर्णय घ्यावा लागणार आहे.