मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:07 IST)

राज्यात एकूण 84,627 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात गुरुवारी  4,496 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 7,809 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 16,05,064 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 84,627 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.44% झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी कोरोनाचे 4,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 122 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 17,36,329 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 45 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 16 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 16,05,064 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.