शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 4 एप्रिल 2020 (15:15 IST)

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर

करोनाचा मुंबईत अजून एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. करोनाची लक्षणं असल्याने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचार सुरु असतानाचा शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे रिपोर्ट समोर आले असता त्यांना करोनाची लागण झाली होती हे निष्पन्न झालं.
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने कुठेही परदेशात प्रवास केला नव्हता. त्यामुळे त्यांना लागण झाली कशी याचती माहिती मिळवली जात आहे. दरम्यान या व्यक्तीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे. यासोतच राज्यातील मृतांची संख्या नऊ वर पोहोचली आहे.