शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:23 IST)

होय, सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाले : टोपे

राज्यात कोरोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कबुलीमुळे खळबळ माजली आहे. करोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालनात बोलत होते.
 
“राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला,” असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार,” असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.