मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (16:07 IST)

छत्तीसगढच्या धर्तीवर टेस्टिंग किट खरेदीचा केंद्रानं विचार करावा

छत्तीसगढच्या धर्तीवर टेस्टिंग किट खरेदीचा केंद्रानं विचार करावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं.
 
“टेस्टिंग किटसाठी अद्याप पैसे दिले नसले तरी खरेदी, वितरण, त्यातील दोष कळण्यात आणि ते परत करण्यात मौल्यवान वेळ वाया गेला. चाचण्यांना झालेल्या दिरंगाईने देशाने आधीच जबर किंमत चुकवली आहे. त्यामुळे अधिक विलंब न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किटची खरेदी करता येईल का ? याचा विचार करावा,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.