सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (15:51 IST)

बाप रे !कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला, व्हिडीओ व्हायरल.

बलरामपूर :उत्तरप्रदेशच्या बलरामपुरात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्या मध्ये दोघे व्यक्ती एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पूल वरून नदी पात्रात फेकताना दिसत आहे.हा मृतदेह फेकणारे दोघे व्यक्ती असून त्या पैकी एकाने पीपीई किट घातल्याचे दिसत आहे. हा प्रकार सिसई घाटावरील पुलावर घडताना हे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये तिथून जात असलेल्या एका इसमाने चित्रित करून त्याला व्हायरल केले आहे. 
 
हा प्रकार 29 मेच्या संध्याकाळचा आहे.त्या दोघांपैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून तो श्मशानघाटावर काम करत असून त्याचे नाव चंद्र प्रकाश आहे.त्याला या घटनेबद्दल विचारले असताना तो म्हणाला,की मला काही लोकांनी त्या पुलावर बोलविले आणि पुलावर नेलं तेव्हा एका व्यक्तीने बॅगेची चेन उघडून दगड टाकला नंतर मृतदेह टाकून परत गेला.इथे लाकडं आहे असं मी त्याला सांगितल्यावर नदीपात्रातच मृतदेह प्रवाहित करायचे आहे असे त्याने मला सांगितले.
 
तो मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनाथ मिश्रा नावाच्या एका इसमाचे असल्याची माहिती मुख्य आरोग्याधिकारीने दिली.कोरोना बाधित प्रेमनाथ यांचा 28 मे रोजी मृत्यू झाला असताना कोरोना प्रोटोकॉल चे पालन करीत आम्ही त्यांच्या मृतदेह त्यांच्या कुटुंबाला सोपविले होते.मृतदेह नदीत फेकल्याच्या प्रकरणात त्या दोघा इसमांवर गुन्हा दाखल केला असून अजून तपास सुरु आहे.