रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (16:46 IST)

कोरोनाला नष्ट करण्यासाठी आता माऊथ स्प्रे

कोरोना विषाणूला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी स्वीडनमधील ‘एनजायमेटीका’ कंपनीने माऊथ स्प्रे तयार केला आहे. या माऊथ स्प्रेने 98.3 टक्के कोरोना विषाणूला नष्ट करता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. 
 
ColdZyme असे या माऊथ स्प्रेचे नाव आहे. या स्प्रेने 20 मिनिटात 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट होतो, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने २० जुलैच्या रिसर्चनंतर याबाबतचा अहवाल दिला आहे. एनजायमेटीका कंपनीने अमेरिकेतील मायक्रोबाक्स लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय परिक्षणासाठी या स्प्रे चे संशोधन केले आहे. 
 
ColdZyme हे औषध सर्दी, खोकल्यासाठीही वापरता येऊ शकते. या स्प्रे ने माणसाच्या शरीरातील अनेक प्रकारच्या विषाणूशी लढता येऊ शकते, असे मायक्रोबाक्स लॅबमधील परिक्षणातून समोर आले आहे.