मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (22:10 IST)

कोरोनाची नवी लक्षणे, हाताला वेदना, झिणझिण्या येतात

New symptoms of corona
जागातिक आरोग्य संघटनेने  ताप, खोकल, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव इत्यादी कोरोनाची लक्षणे आहेत असे सांगितले आहे. तर काही आठवड्यांपूर्वी चव आणि गंध न घेता येणे हे कोरोनाचे लक्षण असल्याचे म्हटले गेले. याव्यतिरिक्त काही रुग्णांच्या मेंदूवर परिणाम झाल्याचे देखील समोर आले. ब्रिटनच्या एका अहवालानुसार, हातामध्ये वेदना होणे आणि हाताला झिणझिण्या येणे हे देखील कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण असल्याचे सांगितले जात आहे. ज्यास पॅराथिसिया म्हटले जाते. 
 
या अहवालानुसार इंग्लंडमधील कोरोना रुग्णांना हाताला झिणझिण्या येणे आणि वेदना होण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही रुग्णांच्या मते त्यांना विजेचा झटका बसल्यासारखे वाटते आणि नंतर संपूर्ण शरीरावर झिणझिण्या आल्यासारखे वाटते. एका रूग्णाने सांगितले की, त्याच्या हातात झिणझिण्या येणे हेच कोरोना विषाणूचे पहिल्यापासूनचे लक्षण आहे. या नवीन लक्षणांचे नाव पॅराथिसिया आहे आणि यामध्ये सुई किंवा पिन टोचल्या सारख्या वेदना होत असतात.