शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (18:29 IST)

परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहिल - नवाब मलिक

कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
 
सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला कॉरनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती. 
 
'त्या' रुग्णाचा पहिला आणि आज दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला आहे.
 
दरम्यान याकामी मेहनत घेणार्‍या यंत्रणेचे विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या कामाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कौतुक केले आहे आणि यापुढेही परभणी जिल्हा कोरोनामुक्तच राहिल असा विश्वासही व्यक्त केला आहे.