बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (17:38 IST)

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन

पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे संबंधित 
डॉक्टर आणि संपर्कात आलेल्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
 
३१ मार्चला रिक्षा चालक असलेल्या व्यक्तीचा कासारवाडी येथे अपघात झाला होता. त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला तातडीने एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाली आहे.