गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार

दिल्लीतील मरकजमधून परतल्यानंतर क्वारंटाईन केलेले १० जण शुक्रवारी पसार झाल्याचे धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी शिरूर येथील संबंधित केंद्राच्या प्रमुखाससह ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन केलेले १० जण पसार झाल्याने पोलीस प्रशासनाचा ताण आणखी वाढला आहे.

शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे केंद्र आहे. नगरपरिषदेच्यावतीने सर्वेक्षण चालू असताना या शिक्षण केंद्रात दिल्लीतील परतलेले १० जण आढळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १ एप्रिलला त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या हातावर शिक्के देखील मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पोलीस निरीक्षक आणि नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी आले असताना ते पसार झाल्याचे समोर आहे.