गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 24 जुलै 2021 (09:29 IST)

नगर जिल्ह्यातील ह्या ८ हॉस्पिटलमध्ये होणार लसीकरण

Vaccination will be done in these 8 hospitals in Nagar district Maharashtra News Coronavirus News in Marathi Webdunia Marathi
अहमदनगर कोरोना विरोधात लढण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
 
जिल्ह्यात ८ खासगी रुग्णालयांत लस दिली जाणार असून त्यामुळे लसीकरणाला होणारी गर्दी टाळणे शक्य होणार आहे,शासनाच्या निर्देशानुसार शहरातील आठ खासगी हॉस्पिटलला लसीकरणासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
 
सदर लस ही कंपनीकडून संबंधीत हॉस्पिटलला शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये खरेदी करून सदर लसीचे शुल्क नागरिकांनाकडून आकारून लस देण्यात येईल. तसेच लसीकरण करणार्‍यांचा अहवाल खाजगी हॉस्पिटल यांनी मनपाकडे वेळोवेळी देणे बंधनकारक आहे.
 
तरी नागरिकांनी सहशुल्क लसीकरणाचा लाभ घ्यावा व कोविडपासून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असे आवाहन, महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले आहे.
 
ह्या आठ हॉस्पिटलला परवानगी शहरातील सावेडी येथील मॅक्सकेअर, टिळक रोडचे सिध्दीविनायक,नागापूर येथील सिनारे हॉस्पिटल,तारकपूरचे लाईफ लाईन,
 
लालटाकीचे वहाडणे,कोठी येथील पाटील हॉस्पीटल,कल्याण रोडवरील हराळ तर चाणक्य चौकातील जयश्री नर्सिग होम या हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे.