शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (16:34 IST)

लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये

कोरोनाकाळातही महत्त्वाच्या लसीकरणालाही प्राधान्य देत लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असताना मार्च महिन्यात सर्व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लागलीच जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्याने जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यापर्यंत कोरोना वेशीवरच रोखले. त्यानंतर मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य विभागाने दिवसरात्र आरोग्यसेवेचे व्रत अविरत चालू ठेवले. रुग्ण मिळाल्यानंतर त्याच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेण्यापासून तर कोविड सेटरमध्ये दाखल करुन उपचार करण्यापर्यंतची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर आली. यासोबतच इतर आजारावर उपचार करण्याचेही काम असल्याने मोठा ताण पडला होता. तरीही आरोग्य यंत्रणेने कोरोनासोबतच महत्वाच्या लसीकरणावरही लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४७.२५ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे.