अफ्रिकन खेळाडू ढसाढसा रडले....
चांगली धावसंख्या उभी करुनही न्युझीलंड संघाविरुध्द सपाटून मार खाल्यानंतर अफ्रिकेच्या खेळाडूंना भावना अनावर झाल्या. खेळाडूंच्या चेहºयावर पराभवाचा धक्का स्पष्टपणे जाणवत होता. काहींना अश्रू अनावर झाले, ते ढसाढसा रडले.
सेमीफाइनलमध्ये न्युझीलंडकडून पराभव स्वीकारल्यामुळे अफ्रिकन संघाला ‘चाकर्स’चा शिक्का पुसता न आल्याची सल लागून राहिली. शेवटच्या टप्यापर्यंत चांगली खेळी करुन पराभव पदरात पडत असल्याने त्यांच्यावर ‘चोकर्स’चा शिक्का आहे. सेमीफाइनलमध्ये न्युझीलंडकडून पराभव स्वीकारल्यानंतर कप्तान एबी डिविलियर्स नाराज झाला. त्याला उत्तर देताना रडू कोसळले. कॅमेºयासमोर बोलतानाही त्यांना हुंदके आवरत नव्हते. अश्रू पुसताना तो गप्पच होता. माझ्या जीवनातील हा सर्वांत मोठा पराभव आहे, हे पचविणे कठीण जात असल्याचे तो हुंदके देत म्हणाला.