1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

स्टीव्ह वॉ

नाव : स्टीफन रॉजर वॉ
जन्म : २ जून १९६५
ठिकाण : सिडनी
देश : ऑस्ट्रेलिया
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. भारत, मेलबोर्न, १९८५
वन डे पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड, मेलबोर्न, १९८६
शैली : उजव्या हाताचा फलंदाज व उजवा मध्यमगती गोलंदाज

दबावाचच्या क्षणी शांतपणे खेळून संघाला विजय मिळवून देणारा व उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारा खेळाडू म्हणून स्टीव्ह वॉ ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडू म्हणून १९८५ च्या सुमारास तो संघात आला.

त्याकाळात ऑस्ट्रेलियाची कामगिरी खराब होत होती. मात्र, स्टीव्ह वॉ ने ऑस्ट्रेलियाला पुन्हा विजयपथावर आणले. १९८७ मधील विश्वचकरंडक जिंकून देण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. तर १९८९ मध्ये प्रतिष्ठित अ‍ॅशेस करंडकही त्याने संघास मिळवून दिला.
नंतर त्याचा फॉर्म हरपला व त्यामुळे १९९१ मध्ये त्याला वगळण्यात आले व त्याचा जुळा भाऊ मार्क वॉला संघात स्थान देण्यात आले. त्यानंतर पुन्हा स्टीव वॉचे 1992 मध्ये पुनरागमन झाले. नंतर संघातील स्थानही पक्के झाले. १९९७-९८ मध्ये त्यावेळचा कर्णधार मार्क टेलर व यष्टिरक्षक इयान हिली यांना संघातून काढून टाकण्यात आले व स्टीव्ह वॉ कडे कर्णधारपद सोपवण्यात आले.

यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जणू कातच टाकली. विश्वविजेतेपदाकडे वाटचाल केली. १९९९ चा विश्वकरंडक त्यांनी जिंकला. त्यांनतर तो २००१- ०२ पर्यंत वन डे त खेळणार्‍या संघाचा कर्णधार राहिला.

पुरस्कार
विस्डेन सर्वोत्तम क्रिकेटपटू १९८९
विस्डेन सर्वोत्तम क्रिकेटपटू २००१-०२
अ‍ॅलन बॉर्डर मेडल २००१


कसोटी
सामने - १६८
धावा - १०९२७
सरासरी - ५१.०६
सर्वो्त्तम - २००
१००/५० - ३२/५०
बळी - ९२
सर्वोत्तम - ५-२८
झेल - ११२

वन डे
सामने - ३२५
धावा - ७५६९
सरासरी - ३२.९०
सर्वो्त्तम - १२०
१००/५० - ३/४५
बळी - १९५
सर्वो्त्तम - ४-३३
झेल - १११