शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:55 IST)

दत्त परिक्रमा

श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ देणारी परिक्रमा आहे. श्री दत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत अशात जगद्गुरू होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके. श्रीदत्त परिक्रमा भक्ताची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे. त्याचा क्रम खालीलप्रमाणे आहे:
 
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी
५. अमरापूर
६. पैजारवाडी
७. कुडुत्री
८. माणगाव
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड
११. कुरवपूर
१२. मंथनगुडी
१३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर
१७. अक्कलकोट
१८. लातूर
१९. माहूर
२०. कारंजा
२१. भालोद
२२. नारेश्वर
२३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर
 
दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील असून एकूण साधारण ३६०० कि.मी.चा हा प्रवास आहे. हा प्रवास वाहानाने करता येतो. श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहेत. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.
 
दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघतं. याची अनुभूती काही वेगळीच आहे. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणाची अनुभूती घेऊन साधक स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते. दत्त परिक्रमा केल्याने साधकाच्या मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते.