शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:51 IST)

गुरूचरित्र – अध्याय सव्विसावा भाग 2

या भरतखंडत । पूर्वी होते पुण्य बहुत । वर्णाश्रमधर्म आचर । होते लोक परियेसा ॥२१॥
या कलियुगाभीतरी । कर्म सांडिले द्विजवरी । लोपले वेद निर्धारी । गुप्त जाहले क्षितीसी ॥२२॥
 
कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेच्छा सांगती वेदबीज । सत्त्व गेले सहज । मंदमती झाले जाण ॥२३॥
पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणासी देवत्व । वेदबळे नित्यत्व । भूसुर म्हणती त्या काजा ॥२४॥
 
पूर्वी राजे याच कारणी । पूजा करती विप्रचरणी । सर्व देता दक्षिणादानी । ते अंगिकार न करिती ॥२५॥
वेदबळे विप्रांसी । त्रिमूर्ति वश होते त्यांसी । इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥२६॥
 
कामधेनु कल्पतरू । विप्रवाक्ये होत थोरू । पर्वत करिती तृणाकारू । तृणा पर्वत परत्वे ॥२७॥
विष्णु आपण परियेसी । पूजा करी विप्रांसी । आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्त्वे करोनिया ॥२८॥
 
श्लोक ॥ देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं । ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम्‍ ॥२९॥
ऐसे महत्त्व द्विजांसी । पूर्वी होते परियेसी । वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अज्ञानमार्गे रहाटती ॥२३०॥
 
हीन यातीपुढे ऐका । वेद म्हणती मूर्ख देखा । त्यांच्या पाहू नये मुखा । ब्रह्मराक्षस होताती ॥३१॥
तेणे सत्त्व भंगले । हीन यातीते सेविले । अद्यापि क्रय करिती मोले । वेद भ्रष्ट करिताती ॥३२॥
 
ऐशा चारी वेदांसी । शाखा असती परियेसी । कोणे जाणावे क्षितीसी । सकळ गौप्य होऊनि गेले ॥३३॥
चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी । काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेत जाण ॥३३४॥
 
ऐशामध्ये काय लाभ । घेऊ नये द्विजक्षोभ । कोणी केला तूते बोध । जाई म्हणती येथून ॥३५॥
आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रे दाखविसी । त्रिविक्रम यतीपासी । पत्र मागसी लिहुनी ॥३६॥
 
आमुचे बोल ऐकोनि । जावे तुम्ही परतोनि । वाया गर्वे भ्रमोनि । प्राण आपुला देऊ नका ॥३७॥
ऐसे श्रीगुरु विप्रांसी । सांगती बुद्धि हितासी । न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करू ॥३८॥
 
चर्चा जरी न करू येथे । हारी दिसेल आम्हांते । सांगती लोक राजयाते । महत्त्व आमुचे उरे केवी ॥३९॥
सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोमन्ता । नेणती आपुले हिता । त्यासी मृत्यु जवळी आला ॥२४०॥
 
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । वेदविवरण ऐकता साधनु । होय समाधान श्रोते जना ॥४१॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । चारी वेदांचा मथितार्थ । उकलोनि दाविला यथार्थ । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥२४२॥
 
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्‍विंशोऽध्यायः ॥२६॥
 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥२४२॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

गुरूचरित्रअध्यायसव्विसावाभाग1