कार्तिक महिन्यात तीन दिवाळी येतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला छोटी दिवाळी ज्याला आपण नरक चतुर्दशी देखील म्हणतो. या नंतर अमावस्येला मोठी दिवाळी आणि पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतो. पुराणात कार्तिक महिन्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या कार्तिक पौर्णिमाला केल्या जाणाऱ्या 10 महत्त्वाची कामे आणि कार्तिकी पौर्णिमेच्या महत्त्वाबद्दलची माहिती.
कार्तिकी पौर्णिमेचे महत्त्व -
देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीला देव जागे होतात आणि कार्तिकी पौर्णिमेला यमुनेच्या काठी अंघोळ करून दिवाळी साजरी करतात. म्हणूनच याला देव दिवाळी असे म्हणतात. या दिवशी संध्याकाळी विष्णूंनी मत्स्यावतार घेतला होता. या पौर्णिमेला ब्रह्मा, विष्णू, शिव, अंगिरा आणि आदित्य इत्यादींनी महापुनीत उत्सव म्हणून प्रमाणित केले आहे.
रोगापहं पातकनाशकृत्परं सद्बुद्धिदं पुत्रधनादिसाधकम्।
मुक्तेर्निदांन नहि कार्तिकव्रताद् विष्णुप्रियादन्यदिहास्ति भूतले।।
म्हणजेच - कार्तिक महिना आरोग्य देणारा, रोगांचा नाश करणारा, सद्बुद्धी देणारा आणि आई महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
या दिवशी कृत्तिका नक्षत्र असल्यास ही महाकार्तिकी असते. भरणी नक्षत्र असल्यास चांगले फळ देते आणि रोहिणी नक्षत्रे असल्यास याची महत्ता वाढते. या दिवशी कृत्तिकांवर चंद्र आणि विशाखा नक्षत्रांवर सूर्य असेल तर पद्मक योग असतो. पुष्कर मध्ये हे दुर्मिळ आहे. कार्तिकीला संध्याकाळी त्रिपुरोत्सव केल्यावर
'कीटाः पतंगा मशकाश्च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवाः, दृष्ट्वा प्रदीपं नहि जन्मभागिनस्ते मुक्तरूपा ही भवति तत्र' याने दीपदान केल्यानं पुनर्जन्म भोगावा लागत नाही.
10 महत्त्वाचे कार्य -
1 नदी मध्ये अंघोळ करणे - संपूर्ण कार्तिक महिन्यात पवित्र नदी मध्ये स्नान करण्याचा महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात श्री हरी विष्णू पाण्यात वास्तव्यास असतात. मदन पारिजाताच्या मते, कार्तिक महिन्यात आपल्या इंद्रियांवर संयम बाळगून चंद्र आणि तारे यांच्या उपस्थितीत सूर्योदयाच्या पूर्वीच पुण्यप्राप्तीसाठी नियमानं स्नान करावे. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणं खूप चांगले मानले गेले आहेत. भाविक लोक जेथे यमुनेत स्नान करण्यासाठी जातात तर काही लोक गढगंगा, हरिद्वार, कुरुक्षेत्र आणि पुष्कर सारख्या तीर्थक्षेत्रात देखील स्नान करण्यास जातात.
2 दीपदान - मान्यतेनुसार देव दिवाळीच्या दिवशी सर्व देव गंगेच्या काठी येऊन दिवे लावतात आणि आपला आनंद दाखवतात. म्हणूनच दीपदान करण्याचे महत्त्व आहे. नदी, तलाव इत्यादी जागी दीपदान केल्यानं सर्व प्रकाराचे संकट संपतात आणि त्या व्यक्तीला कर्जापासून सुटका मिळते.
3 पौर्णिमेचे उपास - या दिवशी उपवासाचे देखील महत्त्व आहे. या दिवशी उपवास केल्यानं देवाचे नाम स्मरण, ध्यान केल्यानं अग्निष्टोम यज्ञ सम फलप्राप्ती होते आणि सूर्यलोकाची प्राप्ती होते. कार्तिकी पौर्णिमेपासून सुरू करून प्रत्येक पौर्णिमेला रात्री उपवास आणि जागरण केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी कार्तिक पौर्णिमा स्नानानंतर कार्तिक उपवास पूर्ण होतात.
4 दानाचे फळ- या दिवशी दान केल्यानं दहा यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. या दिवशी दान देण्याचे खूप महत्त्व असत. आपल्या क्षमतेनुसार अन्न दान, वस्त्र दान आणि इतर दान देखील देऊ शकता.
5 तुळशीची पूजा -या दिवसात शाळीग्राम सह तुळशीची पूजा, सेवन आणि सेवा करण्याचे अधिक महत्त्व आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व अनेक पटीने मानले गेले आहेत.
6 निषिद्ध - संपूर्ण कार्तिक महिन्यात उडीद, मूग, मसूर, हरभरा, वाटाणे, मोहरी खाऊ नये. लसूण, कांदा आणि मांसाहार देखील खाऊ नये. या महिन्यात नरक चतुर्दशीचा दिवस सोडून इतर दिवसात तेल लावण्यास मनाई आहे. या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक वस्तूंचे सेवन करू नये. या दिवशी मद्यपानापासून देखील लांब राहावं. या मुळे आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील दुष्परिणाम होऊ शकतात.
7 ब्रह्मचर्य पाळणे - कार्तिक महिना किंवा पौर्णिमेच्या दिवशी इंद्रिय संयम ठेवावं. विशेषतः ब्रह्मचर्य पाळावे हे खूप महत्त्वाचे आहे. ब्रह्मचर्याचे पालन केले नाही तर अशुभ फळांची प्राप्ती होते. इंद्रिय संयम म्हणजे कमी बोलणं, कोणाचीही निंदा - नालस्ती न करणे, वाद-विवाद न करणे, मनावर ताबा ठेवणं, खाण्याविषयी आसक्ती न बाळगणे, अधिक झोपू नये, अधिक जागू देखील नये.
8 जमिनी वर झोपावे - या दिवशी जमिनीवर झोपल्याने मनात सात्त्विकतेचा भाव जागतो त्यामुळे सर्व प्रकाराचे रोग आणि विकार दूर होतात.
9 सामान्य पूजा- या दिवशी तीर्थ पूजा, गंगापूजा, विष्णुपूजा, लक्ष्मी पूजा आणि यज्ञ आणि हवन देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून या मध्ये केलेले स्नान, दान, होम, यज्ञ आणि उपासना केल्याचे अनंत फळ मिळतात. कार्तिक पौर्णिमेपासून एका वर्षापर्यंत पौर्णिमेच्या उपवासाचे संकल्प घेऊन प्रत्येक पौर्णिमेला स्नान, दान इत्यादी पवित्र कार्य करण्यासह श्री सत्यनारायण कथा ऐकण्याची विधी देखील सुरु होते.
10 विशेष पूजा - या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिव,संभूती,प्रीती,संतती, अनुसया आणि क्षमा या सहा तपस्विनी कृत्तिकांची पूजा करावी. कारण या साऱ्या कार्तिक स्वामींच्या माता आहेत आणि कार्तिकेय, खड्गी, वरूण, हुताशन आणि सशुक हे संध्याकाळी दारावर सुशोभित करण्यासारखं आहेत. म्हणून यांचे धूप, दीप नैवेद्याने विधिवत पूजा केल्यानं शौर्य, सामर्थ्य, संयम सारख्या गुणात वाढ होते. तसेच धन-धान्य देखील वाढतं.