शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (08:39 IST)

प्रेमे तुजला भाऊबीज मी ओवळींन!

भाऊ बिजेचा हा सण साजरे करतील जन,
सीमेवरील भाऊ माझा,एकवटतोय प्राण,
आहे उभा तिथं तो खम्बीर म्हणून,
साजरे करतोय आपण खुशीत हा सण,
लाव आज सखी दारी, पणती त्याच्या नावे,
आळवणी देवा तुज,मृत्युंजय जप मी करावे,
सीमेवरील भावा,आणि काय तुज देऊ,
शौर्याची गाथा तुझी, आम्ही सारे गाऊ,
लवकर ये रे तू आपल्या घरी परतून,
प्रेमे तुजला भाऊबीज मी ओवळींन!
......अश्विनी थत्ते