शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (18:02 IST)

मी लक्ष्मी आहे आणि इथून जात आहे, जाणून घेऊ या राजा सत्यदेवची गोष्ट

एके दिवशी राजा सत्यदेव आपल्या महालाच्या दारावर बसलेले होते. तेव्हा एक बाई त्यांच्या घराच्या समोरून निघाली. 
राजाने विचारले 'देवी आपण कोण आहात आणि या वेळी कोठे जात आहात? 
त्या बाईंनी उत्तर दिले, 'मी लक्ष्मी आहे आणि इथून जात आहे'. राजाने म्हटले की ठीक आहे जसी आपली इच्छा.
 
काही वेळा नंतर एक अजून बाई त्याचा दारा समोरून निघाली. 
राजाने तिला देखील विचारले की देवी आपण कोण आहात ? 
त्यावर तिने सांगितले की मी कीर्ती आहे आणि इथून जात आहे. राजाने जशी आपली इच्छा म्हणून तिला उत्तर दिले.
 
काही काळानंतर त्याचा समोरून एक पुरुष निघाला. राजाने त्याला देखील विचारले की आपण कोण आहात?
या वर तो माणूस उत्तरतो की मी सत्य आहे आणि आता मी देखील इथून जात आहे. राजाने लगेच त्याचे पाय धरले आणि त्याला विनवणी केली की आपण इथून कुठेही जाऊ नये.
 
राजा सत्यदेवानी बऱ्याच वेळा विनवणी केल्यावर सत्य मानतात आणि कोठे ही न जाण्याचे ठरवतात. काही काळानंतर राजा सत्यदेवानी बघितले लक्ष्मी आणि कीर्ती दोघी परत येतात. 
 
राजा सत्यदेव त्यांना विचारतात की आपण परत कशे काय आलास ? 
दोन्ही देव्या म्हणतात 'आम्ही अशा स्थळापासून दूर राहू शकतं नाही, जेथे सत्य वास्तव्यास असतो. आणि मग लक्ष्मी, कीर्ती आणि सत्य तिघे राज्य सत्यदेवाचा राज्यात सुखात नांदतात.