1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 (16:58 IST)

भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने पाळावे हे नियम

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मात प्रत्येक व्रत आणि सणामागे काही नियम असतात, ते लक्षात ठेवले तर हे सण आणखीनच शुभ होतात.
 
शुभ मुहूर्तावर औक्षण करा
भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी हे लक्षात ठेवावे की भावाचे तिलक आणि औक्षण केवळ शुभ मुहूर्तावरच करावे.
 
या रंगाचे कपडे घालणे टाळावे
भाऊबीजेच्या दिवशी कपडे निवडताना त्यांचे रंग लक्षात ठेवा. या दिवशी भाऊ-बहिणीने काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्याऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
 
भावाला जेवू घाला
भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. अशात या दिवशी भावाला औक्षण केल्यावर भावाला प्रेमाने स्वत: तयार केलेल्या पदार्थांने जेऊ घाला आणि मग स्वत: जेवण करा.
 
खोटे बोलणे टाळा
भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. अशात या दिवशी भाऊ आणि बहिणीने एकमेकांशी खोटे बोलू नये. तसेच या दिवशी मांस किंवा मद्य सेवन करू नये. कारण असे मानले जाते की ही कामे केल्याने व्यक्तीला यमाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.