संशयितांचे रेखाचित्र आज प्रसिद्ध करणार
राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटातील प्रमुख दहशतवाद्यांना येथील काही जणांनी प्रत्यक्षात बॉम्बं ठेवताना पाहिले असून, त्यांची रेखाचित्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्लीतील अत्यंत गजबजलेल्या बाजारात हे स्फोट घडवून आणल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना काही नागरिकांनी पाहिले असून, या नागरिकांकडून दहशतवाद्यांचे वर्णन माहिती करून घेतले जात असून त्यांची रेखाचित्रे तयार केली जात आहेत.