पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिल्ली बॉम्‍बस्‍फोटातील जखमींची येथील राममनोहर लोहिया रुग्‍णालयात जाऊन विचारपूस केली. जखमींवर उपचारासह इतर सुविधा पुरविण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले आहेत.
दिल्‍लीत शनिवारी सायंकाळी झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोट मालिकेतील गुन्‍हेगारांबद्दल महत्‍वाची माहिती हाती लागल्‍याचा दावा पोलिसांनी केला असून आतापर्यंत आठ जणांना ताब्‍यात घेतले असून 5 प्रत्‍यक्षदर्शींकडून सखोल चौकशी केली आहे.
एवढ्या मोठ्या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी केवळ भंपकबाजीवर भर देण्‍यापलीकडे काहीही केले नाही. स्‍फोटानंतर 2 तासांत 3 वेळा वेगवेगळे क‍पडे बदलून ते माध्‍यमांच्‍या प्रतिनिंधींसमोर आणि कॅमे-यासमोर गेले. त्‍यांच्‍या अशा वागण्‍याने ते प्रसिध्‍दी मिळविण्‍यासाठी ...
मूळचा ऊर्दु शब्‍द असलेल्‍या मुजाहिदीनचा अर्थ 'लढवय्या' असा होतो. एका ठराविक उदेशाने धार्मिक युध्‍द छेडण्‍याची परवानगी इस्‍लाममध्‍ये देण्‍यात आली आहे. त्‍यास 'जिहाद' असे म्‍हटले जाते. त्‍याचा आधार घेऊन दहशतवादी कारवायांसाठी 'जिहाद'च्‍या नावाखाली ...
नवी दिल्ली- व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तौकीर नावाच्या दहशतवाद्याने दिल्लीतील स्फोटांचा कट रचल्याचे उघड झाले आहे. त्याने जुलै महिन्यादरम्यान दिल्लीला भेट दिल्याचा संशय पोलिसांना असून त्याचा तपास करणे अवघड आहे.
नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत झालेल्या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहीद्दीनने घेतली असून इंडियन मुजाहीद्दीन हे सिमीचेच बदललेले रूप असल्याची माहिती आता उघड झाली आहे.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटातील प्रमुख दहशतवाद्यांना येथील काही जणांनी प्रत्यक्षात बॉम्बं ठेवताना पाहिले असून, त्यांची रेखाचित्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांनंतर जखमींना येथील राम मनोहर लोहीया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
दहशतवाद रोखण्यासाठी दिल्लीत होत असलेले आंतराष्ट्रीय संमेलन सुरू होण्यापूर्वीच दोन दिवस पूवीच दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून राजधानी हादरून सोडली.
केंद्र सरकारने सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) वर बंदी करताच याचकालावधीत बॉम्बस्फोट झाल्याने सिमीवर संशय व्यक्त केला जात आहे.
राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे स्पष्ट झालेच शिवाय सरकारी यंत्रणाही कुचकामी ठरली.
नवी दिल्ली- दहशतवाद्यांनी राजधानी दिल्लीत केलेल्या स्फोटांविषयीची माहिती केंद्र सरकारला आधीपासूनच होती, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय जनतापार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलाय.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांबद्दलचा इशारा दहा दिवसांपुर्वीच आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिला होता. परंतु केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने न घेतल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
नवी दिल्ली- एकीकडे रक्ताने माखलेले कपडे आणि विव्हळत पडलेले मृतदेह असा हाहाकार राजधानीतील प्रमुख बाजार पेठांमध्ये माजला असतानाच दुसरीकडे मानवतेला काळिमा फसणाऱ्या काही जणांनी अनेक दुकाने आणि मृतदेहांवर आपला हात साफ केला.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटांमध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकं लपवण्यासाठी कचराकुंडीचाच वापर केल्याचे आता उघड झाले आहे.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील गफ्फार मार्केट भागात झालेल्या शक्तिशाली स्फोटात एका कुटुंबातील चार जणांचा बळी गेल्याने या कुटुंबावर शोककळा पसरली असून, यातील इतर सात सदस्य सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लंडन- राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांनंतर ब्रिटनने या स्फोटांचा निषेध केला असून, दहशतवादाच्या या लढ्यात ब्रिटन भारतासोबत असल्याचे मत परराष्ट्रमंत्री डेव्हिड मिलिबँड यांनी व्यक्त केले.
जयपूर, हैदराबाद आणि अहमदाबाद हादरवल्यानंतर आता दहशतवाद्यांनी राजधानी दिल्लीला लक्ष्य केले आहे. आज दिल्लीत सुरक्षाव्यवस्थेच्या चिंधड्या उडवत दहशतवाद्यांनी महत्त्वाच्या भागात चार ठिकाणी पाच स्फोट घडवून थेट राजसत्तेलाच आव्हान दिले. या स्फोटात १८ जणांचा ...
गेल्‍या काही महिन्‍यांपासून सिमीच्‍या मार्गदर्शनाखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने चालविलेली बॉम्‍बस्‍फोटांच्‍या मालिकेचा दुसरा टप्‍पा पूर्ण झाला असून आता पुढचे लक्ष्‍य मुंबई असणार असल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दहशवाद्यांनी या ...
इस्लामाबाद- राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी व पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी पाकिस्तान भारतीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.