स्फोटकं लपवण्याची दहशतवाद्यांची नवी जागा
राजधानी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटांमध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकं लपवण्यासाठी कचराकुंडीचाच वापर केल्याचे आता उघड झाले आहे. कचराकुंडी ही स्फोटकं लपवण्याची सर्वात सोपी जागा असून, अहमदाबाद नंतर सुरतेत अनेक ठिकाणी सापडलेली स्फोटकंही कचराकुंडीतच सापडली होती. कचरापेटीकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही आणि त्यात टाकलेली वस्तू नेमकी काय याचा कोणीही तपास घेत नसल्याने दहशतवाद्यांनी कचराकुंडीचाच वापर केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.