मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By भाषा|

स्फोटात एकाच परिवारातील चार ठार

राजधानी दिल्लीतील गफ्फार मार्केट भागात झालेल्या शक्तिशाली स्फोटात एका कुटुंबातील चार जणांचा बळी गेल्याने या कुटुंबावर शोककळा पसरली असून, यातील इतर सात सदस्य सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


स्फोटांच्या साक्षीदार शांती देवी यांच्या कुटुंबावर काळाने हा घाला घातला आहे. शांती देवी या त्यांच्या परिवारासह या बाजारात गेल्या असता सायंकाळी पहिला स्फोट झाला.