सोनियांनी केली जखमींची विचारपूस
राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांनंतर जखमींना येथील राम मनोहर लोहीया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. आपल्या धावत्या भेटीत त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही चर्चा केली. त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही रुग्णालयात जखमींची भेट घेतली.