Last Modified: नवी दिल्ली, , शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (23:34 IST)
ऑपरेशन बॅड सक्सेसफूल
गेल्या काही महिन्यांपासून सिमीच्या मार्गदर्शनाखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने चालविलेली बॉम्बस्फोटांच्या मालिकेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून आता पुढचे लक्ष्य मुंबई असणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशवाद्यांनी या संपूर्ण कारवाईस 'ऑपरेशन बॅड' हे नाव दिले आहे.
सिमीचा मास्टर माईंड सफदर नागोरी याच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात दहशतवादी कारवाया पूर्ण करण्यासाठी योजना आखली गेली आहे. या कारवायांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिमीने केरळ, इंदूरसह अनेक ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेतली होती. या संपूर्ण कारवाईस 'ऑपरेशन बॅड' असे नाव देण्यात आले आहे. या BAD चा अर्थ B- बॉम्बे, A- अहमदाबाद आणि D- दिल्ली असा असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे आता दहशतवाद्यांचे पुढचे लक्ष्य मुंबई असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.