दिल्ली स्फोटामागे तौकीरचे डोके
व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तौकीर नावाच्या दहशतवाद्याने दिल्लीतील स्फोटांचा कट रचल्याचे उघड झाले आहे. त्याने जुलै महिन्यादरम्यान दिल्लीला भेट दिल्याचा संशय पोलिसांना असून त्याचा तपास करणे अवघड आहे. तौकीर स्वतः:चा चेहरा बदलण्यात तरबेज असून, त्याने आतापर्यंत विविध 20 नावे धारण करून अनेक गुन्हे केल्याची माहिती जयपूर स्फोटांनंतर अटक करण्यात आलेल्या शहाबाजने दिली आहे. शहाबाजला जयपूर पोलिसांनी अटक केली असून त्याने चौकशीत तौकीर विषयी माहिती दिली. तौकीर हा इंजिनियर असून, त्याच्या लपण्याच्या सात जागा असून, त्याने आतापर्यंत अनेक बाबती महारत मिळवली आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटांमागेही त्याचाच हात असून, पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.