रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

गाजर काजू करी

MHNEWS
गाजर-काजू करी तयार करण्यापूर्वीच थोडासा भात तयार करुन ठेवावा. त्यात दोन वाटी तांदळाला ३ वाटी पाणी घालावं. झाकण ठेऊन तो मंद आचेवर शिजवत ठेवावा. साधारणत: २० मिनिटांनी ते तयार होईल.

साहित्य : एक चमचा आल्याच्या तुकडा, एक चमचा मोहरी, एक चमचा हळद, दोन वाट्या चिरालेला कांदा, ४ लसून पाकळ्या, एक चमचा जिरे, धने व बडीशेप पावडर, चवीनुसार मीठ, २ मध्यम आकाराचे बटाटे (बारीक चिरलेले), ५ मोठी गाजरं (बारीक चिरलेले), १ वाटी दही, २ चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा मिरी पावडर आणि अर्धी वाटी काजूची पूड.

कृती : सर्वप्रथम गरम केलेल्या कढईतील तेल, आलं, लसूण, कांदा, बटाटा, गाजर एकत्र करुन घ्या. त्यात बडीशेप पावडर घालून मंद आचेवर ३ ते ५ मिनिटे उकळत ठेवा. उरलेला मसाला घालून पुन्हा उकळा आणि त्यात लिंबाचा रस घाला. ते झाकून ठेवून मंद आचेवर बटाटा नीट शिजेपर्यंत १५ मिनिटे उकळू द्या. परत त्यात मिरी पावडर घालून आणखी उकळू द्या.

कढी वाढताना गरमागरम वाढा. अगदी आयत्या वेळी त्यात दही घालावे. तयार केलेल्या भातावर काजूचे तुकडे पेरा.

- महान्यूज