कृती : बडीशोप 1 वाटीभर पाण्यात 2 तास भिजत ठेवावी. तोपर्यंत 2 वाटी पाण्यात साखर विरघळवून घ्यावी. बडीशोप पाण्यासकट मिक्सरमधून वाटून घ्यावी. त्यानंतर ती गाळून घ्यावी. मग सारखेच्या पाण्यात मिक्स करावे. सर्व्ह करताना 1 भाग मिश्रणात 4 भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून प्यायला द्यावे.