रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

मटर-कोरिएंडर सूप

ND
साहित्य : 1 कप हिरवे मटर, 1/2 कप कोथिंबीर चिरलेली, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 1 चमचा जिरं, 2 चमचे बटर, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 2 लसुण पाकळ्या, 1 चमचा किसलेला चिझ, सजावटीसाठी तळलेल्या ब्रेडचे तुकडे.

कृती : सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये मटर, कोथिंबीर, मिरच्या, लसुण, लिंबाचा रस, मीठ व 3 कप पाणी घालून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्या मिश्रणाला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात ‍जिर्‍याची फोडणी ध्यावी. नंतर त्यात मिश्रण घालून उकळी आणावी. सर्व्ह करताना चीझ व ब्रेडचे तुकडे घालून द्यावे.