शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (12:21 IST)

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

साहित्य : 1 केळ, 75 ग्रॅम दही, 1 मोठा चमचा साय, 1 मोठा चमचा साखर, 75 ग्रॅम स्पाँज केकचा चुरा, सजावटीसाठी सुके मेवे.
 
कृती : दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून घ्यावे. साखरेचा भुरा करून घ्यावा, दही केळ व सायीला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. केकचा चुरा व साखर टाकून एकजीव करावे. मिश्रणावर सुके मेवे घालून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.