शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (15:31 IST)

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा

साहित्य : 1 लीटर दूध, 200 ग्राम साखर, 1 कप क्रीम, 1 लहान चमचा वेलची पावडर, थोडं केशर, खाण्याचा गोड रंग (हिरवा), बारीक केलेले सुखे मेवे, व्हॅनिला इसेन्स, बर्फ.  
 
कृती : दुधात साखर मिसळून चांगले उकळून घ्या. थंड करून त्यात वेलची पावडर, इसेन्स आणि क्रीम मिसळा. ह्याचे तीन वाटे करा. एका मध्ये हिरवा रंग घाला, दुसऱ्यामध्ये केशर घाला आणि तिसऱ्याला पांढराच राहू द्या.  तिन्ही भाग फ्रीजर मध्ये थंड होण्यासाठी ठेवा.  
 
सर्व्ह करण्याचा आधी प्रत्येक मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्या. काचेच्या ग्लासात आधी बर्फाची चुरी घाला. हिरव्या रंगाचे दूध, बर्फ, केशरी दूध, बर्फ आणि शेवटी पांढरे दूध या पद्धतीने भरा. त्यावर आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे काप घाला.