घरच्याघरी तयार करा गुलाब पिस्ता आइसक्रीम
आइसक्रीम बेस बनवण्यासाठी साहित्य : 1/2 लीटर दूध, 5 मोठे चमचे साखर, 1/2 लहान चमचा जीएमएस पावडर, 1/4 लहान चमचा एएस 4 पावडर, 50 ग्रॅम मिल्क पावडर.
कृती : दुधाला गरम करण्यास ठेवा, हलके गरम झाल्यावर त्यातून 1 कप दूध वेगळे काढा. या 1 कप दुधात जीएमएस पावडर, एएस 4 पावडर आणि मिल्क पावडर घालून चांगल्या प्रकारे एकजीव करा. या मिश्रणाला गरम दुधात मिसळा आणि 2 मिनिट उकळी येऊ द्या. साखर घालून 7-8 मिनिट परत उकळा. बेसला गार करून एका डब्यात घालून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
गुलाब पिस्तासाठी साहित्य : 100 ग्रॅम पिस्ता, 100 ग्रॅम फ्रेश क्रीम, 20 ग्रॅम पिस्त्याचे काप, थोडेसे वाळलेले गुलाबाचे पानं.
कृती : पिस्त्याला 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या. तयार आइसक्रीम बेस फ्रीजरमधून काढा. यात पिस्त्याची पेस्ट घाला, काप केलेले पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या आणि क्रीम घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून परत 7-8 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.