रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

फ्रूट क्रीम विथ ऑरेंज आईसक्रीम

साहित्य : सहा संत्री, दीड पेला क्रीम, एक मोठा चमचा पिठीसाखर, दोन थेंब व्हॅनिला इसेंस, एक पेला संमिश्र पळे, अर्ध्या लिंबाचा रस, एक मोठा चमचा मध.

कृती : संत्री सोलून ज्यूसरमधून रस काढून घ्या. अर्धा मोठा चमचा पिठीसाखर, मध व लिंबाचा रस मिसळून सेट होण्यासाठी वेगवेगळ्या ग्लासात ठेवा. क्रीममध्ये अर्धा चमचा पिठीसाखर व व्हॅनिला इसेंस घालून मिसळा. प्यायला देताना ग्लास फ्रिजमधून बाहेर काढा. काट्याने आइस्क्रीम थोडे सैल करा. त्यावर क्रीमचे पफ ठेवा व फळांनी सजावून सर्व्ह करा.