शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (22:59 IST)

Mint Desi Drinks Recipe : उष्णते पासून आराम मिळण्यासाठी मिंट ड्रिंकच्या या सोप्या रेसिपी बनवा

Mint Tea
उन्हाळ्यात अन्न खाण्यासोबतच ताजेतवाने पेयांची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात काही गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पुदिना, काकडी, लिंबू अशाच काही गोष्टी आहेत, ज्या उन्हाळ्यात हायड्रेट ठेवतात. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी मिंट ड्रिंक्सच्या काही रेसिपी सांगत आहोत. या मुळे उष्णतेपासून आराम मिळण्यासोबत अॅसिडिटी दूर होईल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
1 आइस मिंट आणि लिंबू चहा-
साहित्य - 
पाणी - 4 कप 
मिंट टी बॅग - 4
 लिंबाचा रस- 2 चमचे 
पुदिना - काही पाने 
बर्फाचे तुकडे - 10-15 तुकडे
मध किंवा व्हॅनिला कॉफी सिरप
सोडा वॉटर - 2 कप
 
कृती- 
सर्व प्रथम चार कप पाणी उकळवा. त्यात 3-4 मिंट टी बॅग टाका आणि उकळवून घ्या. आता चांगले उकळल्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता पाणी थंड झाल्यावर ग्लासमध्ये ओता. त्यात अर्धवट बर्फाचा चुरा भरावा आणि नंतर त्यात 1 किंवा 2 चमचे लिंबाचा रस घाला. जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर आपण ते वगळू शकता. आता त्यात अर्धा कप सोडा वॉटर घाला. आता ते चांगले मिसळा आणि पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा
 
 
2 मिंट लस्सी रेसिपी -
साहित्य -
पुदिन्याची पाने - अर्धी वाटी 
पाणी - अर्धा ग्लास 
लस्सी - दोन ग्लास 
बर्फाचे तुकडे - 
काळी मिरी  ,
काळ मीठ 
 
कृती- 
पुदिन्याची लस्सी बनवण्यासाठी आधी लस्सी घ्या त्यात पुदिन्याची पाने ठेचून घाला. आता त्यात अर्धा ग्लास थंड पाणी घाला. त्यात चवीनुसार काळे मीठ आणि काळी मिरी घाला. चविष्ट मिंट लस्सी तयार. त्यात बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करा.