गुलाब सरबत
- वैद्य रजनी गोखले
घटक - गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धी वाटी, पाणी २ वाट्या, साखर २ वाटी.कृती - गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात चार तास भिजवाव्यात. नंतर हे मिश्रण त्याचा १ वाटी काढा बनेल इतपत उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं. आवडत असल्यास यात लाल रंग मिसळावा.उपयोग - थंड, दाहशामक, उत्साहवर्धक