डाळिंबाचं सरबत
- वैद्य रजनी गोखले
घटक - डाळिंब, साखरकृती - पुरणयंत्रातून डाळिंबाचे दाणो काढून रस काढावा. १ वाटीच्या मिश्रणास दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावं. पाणी व साखर एकत्र उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात डाळिंबाचे तयार केलेले मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं.उपयोग - पित्तशामक, रक्तवर्धक आणि उष्णता कमी करणारं.