महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे.
त्यात महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, "आज मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.
"गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्साहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा."
शिवसेना नेते आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलं की, "आज मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी कोरोनाचे निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडवा, रमजान आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करू.सर्वाना शुभेच्छा."