बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By वेबदुनिया|

भाजश अध्यक्ष उमा भारती यांचा पराभव

पाच राज्यांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक दिग्गजांना या निवडणूकीत झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार्‍या भारतीय जनशक्ती पार्टीच्या वादग्रस्त नेत्या उमा भारती यांचा कॉंग्रेस उमेदवाराने मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती टीकमगड मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार यादवेंद्र सिंह यांच्याकडून पराभूत झाल्यात. दुसरीकडे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असून ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला पछाडत आघाडीवर आहेत.

दिल्लीत भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार विजय मल्हौत्रा आणि कॉग्रेसच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित आघाडीवर आहेत.